उपासमारीने तडफडणारा बिबट्या तातडीच्या उपचारामुळे बचावला

कराड  – चोरजवाडी (ता. कराड)  येथील  डोंगर पायथ्याला  तडफडत पडलेला बिबट्या  तातडीच्या उपचारामुळे वाचला. दोन वर्षे वयाच्या या बिबट्याला उपासमारीमुळे हालचाल करता येत नव्हती. तो फक्त डरकाळ्या फोडत होता.याबाबतची माहिती अशी, शनिवारी (29 सप्टेंबर) रात्री 8 च्या सुमारास जयवंत शुगर कारखान्याच्या पुढे चोरजवाडी गावच्या नजीक डोंगर पायथ्याला एक बिबट्या ओढ्यानजीक तडफडत पडला असल्याची माहिती एका गुराख्याने कराड येथील वनक्षेत्रपाल डॉ. अजीत साजणे यांना दिली.

माहिती मिळताच वनक्षेत्रपाल साजणे यांनी आपला बीट गार्डला तात्काळ घटनास्थळी पाठवून नेमकी काय परिस्थिती आहे ते कळविण्यास सांगितले. गार्डने घटनास्थळी जाऊन  पाहिले असता  डोंगर पायथ्याला एका ओढ्यालगत बिबट्या तडफडत असल्याचे त्याला दिसले. जमिनीवर पालथा पडलेला बिबट्या अधून मधून डरकाळी फोडत होता. ही परीस्थिती गार्ड ने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली. तोपर्यंत रात्रीचे सव्वा नऊ वाजले होते. त्यातच पाऊस पडत होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रसंगाचे गांभीर्य ओळखून वनक्षेत्रपाल साजणे यांनी फोनाफोनी करुन सर्व ठिकाणच्या गार्डना घटनास्थळी पोहचण्याचे आदेश दिले व पशुवैद्यकीय अधिकारी शोधायला सुरुवात केली.  त्या दरम्यानच रात्री 10 वाजता मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना  मदतीसाठी बोलावून घेतले. क्षणाचाही विलंब न करता भाटे हजर झाले. 10.10 मिनिटांनी गाडीत बसून साजने आणि भाटे हे डॉक्टरांना घेण्यासाठी  त्यांच्या घराकडे गेले. मात्र डॉक्टर घरी नव्हते आम्ही डॉक्टरही भेटले नाहीत. त्यामुळे डॉक्टरांना हे सर्वजण घटनास्थळाकडे रवाना झाले. रात्री 11.30 ला ते घटनास्थळी पोहचले.

दरम्यान, सातारा येथून मोबाईल स्कॉडचे वनक्षेत्रपाल  संदीप गवारे हे पण घटनास्थळी यायला निघाले होते. त्यांच्यासोबत सातारा येथून त्यांनी डॉक्टरांना घेतले होते.म्हणून आम्ही वेळ न घालवता बिबट्याला सुरक्षितस्थळी उपचारासाठी हलविणे आवश्यक असल्याचे ओळखून भाटे व साजणे यांनी बिबट्यास पकडले.

बिबट्या फक्त तोंडाने प्रतिकार करत होता. पण त्याला चारही पाय हलवता येत नव्हते. त्यामुळे बिबट्याला पकडणे सोपे गेले. पकडलेल्या बिबट्याला पायपीट करून वनविभागाच्या गाडीपर्यंत आणण्यात आले. बिबट्याला घेऊन गाडी कराडच्या दिशेने निघाली. तोपर्यंत सातारहून मोबाईल स्कॉडचे वनक्षेत्रपाल  संदीप गवारे आले. त्यामुळे  जखमी बिबट्यावर लागलीच उपचार सुरु केले गेले. उपचाराला बिबट्याने प्रतिसादही द्यायला सुरुवात केली. त्यास ताजे चीकन खायला देऊन पुढील उपचारासाठी सुरक्षीतस्थळी हलविण्यात आले आहे.

शनिवारी रात्री 9 ते पहाते 5 पर्यंत अनेक गार्ड, सातारा येथील डॉक्टर, वनक्षेत्रपाल डॉ. साजणे, वनक्षेत्रपाल  गवारे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी केलेल्या धावपळ आणि प्रयत्नांमुळे उपासमारीमुळे तडफडणारा बिबट्या अखेर बचावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)