नवी दिल्ली – बाजार नियंत्रक सेबीने फ्युचर समूहाचे प्रमुख किशोर बियाणी आणि इतरांना इन्सायडर ट्रेडिंग बद्दल शेअर बाजारात व्यवहार करण्यावर बंदी घातली होती. मात्र यासंदर्भातील लवादाने सेबीच्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
लवादाने फ्युचर समूहाच्या प्रवर्तकांना 11 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले आहे. या विषयावरील पुढील सुनावणी 12 एप्रिल रोजी होणार आहे. फ्युचर समूहाने आपले बरेच उद्योग रिलायन्स इंडस्ट्रीजला विकण्यातचा व्यवहार केलेला आहे.
त्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. अमेझॉन कंपनीने या व्यवहाराला हरकत घेतली आहे. त्याचबरोबर सेबीने घातलेल्या बंदीमुळे ही या व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता होती. यातील एक अडथळा कमी झाला आहे.