दिवसभरात 22 हजारांचा दंड वसूल – सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे
पुणे (प्रतिनिधी): करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमावली तयार केली आहे. तरीही नागरिक त्याचे उल्लंघन करून सर्रास रस्त्यावर वावरत असल्याने पोलिसांनी सासवडमध्ये दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. सोमवारी (दि. 12) तब्बल 22 हजारांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी दिली.
सासवड हद्दीत नियमांचे उल्लंघन करून फिरत असलेल्या 43 नागरिकांविरूद्ध 188प्रमाणे गुन्हे अन्वेषण मोटार वाहन कायदा 87 खटले दाखल करुन 19 हजार तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 6 खटले दाखल करून 3 हजार असा एकूण 22 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
करोनाने थैमान घातले असताना नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, स्वत:ची व आपल्या कुटुंबांची काळजी घेत असताना मास्क, सेनिटाझजर यांचा वापर करावा, पांच पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येऊन समूह करुनये असेही घुगे यांनी नमूद केले.