अपहृतास सोडवण्यासाठी सासवडच्या सहायक पोलीस निरीक्षकाचा हवेत गोळीबार

चांबळी येथील थरारक घटना : दोघांना अटक

सासवड – चांबळी (ता. पुरंदर) येथे खंडणीच्या हेतूने अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या खंडणीखोरांना रोखण्याकरिता सासवडचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी हवेत गोळीबार केल्याने अपहृताचा जीव वाचला. ही थरारक घटना सोमवारी (दि. 9) सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात सहा जणांसह इतर 4 ते 5 अज्ञात व्यक्‍तींविरोधात खंडणी, अपहरणाचा प्रयत्न, जबरी मारहाण यांसह अनेक गंभीर गुन्हा दाखल केला आहे. तर दोघांना अटक केली आहे.

महेश कामठे असे अपहरण करून मारहाण करण्यात आलेल्याचे नाव असून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आशिष शेंडकर, उद्धव कानिफनाथ शेंडकर (दोघे रा. चांबळी) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दिगंबर दशरथ शेंडकर (रा.चांबळी), आदित्य तानाजी चौधरी (रा. नारायणपूर), अनिकेत महादेव काळे, सागर काळे (दोघे रा. सोनोरी) यांसह इतर अनोळखी 4 ते 5 व्यक्‍ती फरार आहेत. तर महेश भैरवनाथ कामठे (वय 25 रा. चांबळी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी (दि. 11) सायंकाळी 5.30 ते 6.30 वाजण्याच्या सुमारास दिगंबर शेंडकरने महेश कामठे यांना अडवून मारहाण केली. त्यानंतर मोटरसायकलवरून खंडणी मागणीच्या हेतूने जबरदस्तीने पळवून नेत असताना त्यावेळी त्यांचा भाऊ सागर कामठेने सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविल्यानंतर घुगे व त्यांचे सहकारी वेळीच घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यानच्या काळात कामठे यांना शेंडकरने चांबळी गावाच्या गायरान जागेमध्ये आणल व साथीदारांच्या सहाय्याने जबर मारहाण केली. तसेच कामठे यांना जीवे मारण्याच्या हेतूने शेंडकरने दगडने मारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळीच सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी प्रसंगावधान राखत कामठेंच्या संरक्षणासाठी एक गोळी हवेत झाडली, त्यामुळे त्यांचा जीव थोडक्‍यात बचावले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन आरोपींनी कामठेंच्या खिशातील दोन हजार रुपये चोरून जवळच्या डोंगरात पसार झाले.

गुन्ह्यातील आरोपींचा सासवड पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. पोलिसांची गस्त तालुक्‍यातील संशयीत ठिकाणी सुरू असून लवकरच आरोपींना पकडण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके
यांनी सांगितले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)