धनबाद – सरसंघचालक मोहन भागवत यांचा 71 वा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. सरसंघचालक सध्या झारखंडची राजधानी धनबाद येथे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा येथे जन्मदिन साजरा केला जाईल, अशी माहिती संघाच्या एका पदाधिकाऱ्याने दिली होती, पण आज त्या वाढदिवसानिमित्त कोणतेही सेलिब्रेशन झाले नाही.
सरसंघचालकांनी आज ठरल्याप्रमाणे संघाच्या झारखंड युनिटच्या कार्यकारिणी सदस्यांशी चर्चा केली. त्यानंतर भाजप, विश्व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघाच्या शांखांमध्ये काम करणाऱ्या काही ज्येष्टांनी भागवत यांची भेट घेऊन त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्यांना संघातर्फे नम्रपणे नकार देण्यात आला.
राजकमल सरस्वती विद्या मंदिर येथे भागवत निवासासाठी आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संघ परिवारातील संघटनांचे जे प्रतिनिधी आले होते, त्यांना विद्यामंदिराच्या गेटवरूनच परत जावे लागले.