माण तालुक्‍यात 57 गावांमधील सरपंचपदे खुल्या प्रवर्गासाठी

गोंदवले – माण तालुक्‍यातील 95 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत दहिवडी येथे माउली मंगल कार्यालयात शुक्रवारी झाली. त्यातील 57 गावांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंचपदे आरक्षित झाली. त्यापैकी 29 ठिकाणी महिलांना संधी मिळणार आहे.

कारखेल, वाकी, देवापूर, येळेवाडी, संभूखेड, वडगाव, उकिर्डे, तोंडले, काळेवाडी, जाशी, मोही, बनगरवाडी, ढाकणी, पानवण, कुळकजाई, पिंगळी खुर्द, वाघमोडेवाडी, आंधळी, गोंदवले बुद्रुक, पाचवड, दिवडी, लोधवडे, शिरताव, चिलारवाडी, कुकुडवाड, टाकेवाडी, खुटबाव व बिदाल येथील सरपंचपदांवर सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्यांना संधी मिळणार आहे.

थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, दानवलेवाडी, विरळी, गटेवाडी, मनकर्णवाडी, अनभुलेवाडी, हिंगणी, धुळदेव, पांगरी, शेवरी, हवालदारवाडी, पळसावडे, शिंगणापूर, शिंदी बुद्रुक, स्वरूपखानवाडी, गंगोती, शेनवडी, दिवड, महाबळेश्वरवाडी, कासारवाडी, मलवडी, पिंपरी, काळेवाडी, राजवडी, जाधववाडी, इंजबाव व काळचौंडी येथे सर्वसाधारण प्रवर्गातील महिला सरपंचपदी विराजमान होणार आहेत.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) 26 ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. त्यापैकी बजवडी, पळशी, पुकळेवाडी, किरकसाल, सत्रेवाडी, दीडवाघवाडी, गोंदवले खुर्द, दोरगेवाडी, जांभुळणी, नरवणे, चिठ्ठीद्वारे भांडवली, भालवडी, सोकासन येथील पदे या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली. मोगराळे, मार्डी, वडजल, शिंदी खुर्द, वळई, वरकुटे-म्हसवड, रांजणी, शिरवली, श्रीपालवण, पुळकोटी, राणंद, वरकुटे-मलवडी व पर्यंती येथील पदे या प्रवर्गातील खुल्या गटासाठी आहेत.

अनुसूचित जातीचे आरक्षण झालेल्या पिंगळी बुद्रुक, परकंदी, खडकी, बोथे (सदस्यच नाही), कुरणेवाडी, भाटकी येथील सरपंचपदे महिलांना मिळणार आहेत, तर महिमानगड, हस्तनपूर (घेरेवाडी), धामणी, वारुगड, बोडके, पांढरवाडी (चिठ्ठीद्वारे) ही या प्रवर्गातील खुल्या गटासाठी आरक्षित झाली आहेत. यावेळी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बी. एस. माने, नायब तहसीलदार विलास करे, तुषार पोळ उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.