शेवगाव, -जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय स्वराज अभियानांतर्गत (RGSA) दि. ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत आयोजित ओरिसा राज्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी तालुक्यातील लाडजळगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अंबादास ढाकणे रवाना झाले आहे.
ढाकणे यांची अभ्यास दौऱ्यासाठी यशदामार्फत निवड झाली असून “आर.आर.आबा गाव माझे सुंदर ” स्पर्धेत शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव व हिंगणगाव या दोन गावांनी भाग घेतला होता. जि. प.परिषद शाळा परिसर, गाव परिसर, ग्रामपंचायत परिसर, सार्वजनिक ठिकाणचा परिसर इत्यादी स्वच्छ आणि सुंदर स्पर्धेमध्ये शेवगाव तालुक्यातून या ग्रामपंचायतीला पहिले बक्षीस मिळाले होते.
त्यामुळ सरपंच ढाकणे व ग्रामसेवक सी.आर.आहिरे यांना यशदामध्ये तीन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. तेथेच अभ्यास दौऱ्यासाठी १३ पदाधिकारी व अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये लाडजळगावचे सरपंच ढाकणे यांचा समावेश होता. ढाकणे यांच्या निवडीबद्दल आ. मोनिका राजळे, ज्येष्ठ नेते रामजी केसभट, बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, वाय.डी. कोल्हे, आदर्श गाव वाघोलीचे प्रणेते उमेश भालसिंग तसेच लाडजळगाव ग्रुप ग्रामपंचायत सदस्यांनी अभिनंदन केले आहे.