मुंबई – बॉलिवूडमध्ये गेल्या ४० वर्षांपर्यंत अनेक मोठ्या अभिनेत्रींना डान्स शिकविणाऱ्या सरोज खान यांचे ३ जुलै २०२० रोजी निधन झाले. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ रोजी झाला होता.
बॉलिवूड कोरिओग्राफर सरोज खान यांनी गेल्या २२ नोव्हेंबर रोजी वयाचे ७१ वर्ष पूर्ण करून ७२ व्या वर्षात पदार्पण केले होते. बॉलिवूडमध्ये गेल्या ४० वर्षांपर्यंत अनेक मोठ्या अभिनेत्रींना डान्स शिकविला आहे. त्यांनी सुमारे २००० पेक्षा अधिक गाणे कोरिओग्राफ केले आहेत.
सरोज खान यांचा जन्म किशनचंद संधू सिंह आणि नोनी संधू सिंह यांच्या घरात झाला. त्यांचे खरे नाव निर्मला किशनचंद्र संधू सिंह नागपाल होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. तीन वर्षांच्या असताना त्यांनी चाइल्ड आर्टिस्ट श्यामा म्हणून डेब्यू केला होता.
सरोज खान यांचे लग्न केवळ १३ व्या वर्षी जाले. ४३ वर्षांचे डान्स मास्टर बी. सोहनलाल यांच्याशी इस्लाम कबूल करून लग्न केले. बी सोहनलाल याचे लग्न झाले होते. तसेच ते चार मुलांचे वडिलही होते.
सरोज खान यांनी आपल्या लग्नाबद्दल एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मी शाळेत जात होती. मला नाही माहिती की लग्नाचं महत्त्व काय होतं. एके दिवशी मास्टर सोहनलाल यांनी गळ्यात एक धागा बांधला, त्यांना वाटलं की त्यांचे लग्न झाले आहे.
सरोज खान यांच्या लग्नात खूप अडचणी आल्या. सरोज खान यांना माहिती नव्हते की त्याचे पती यांचे पूर्वीच लग्न झाले आहे. मुलगा राजू खान यांच्या जन्मानंतर त्यांना या गोष्टीचा खुलासा झाला. तेव्हा त्या १४ वर्षांच्या होत्या. १९६५ मध्ये त्यांनी दुसऱ्या बाळाला जन्म दिला. पण त्याचा आठ महिन्यानंतर मृत्यू झाला.
सरोज खानच्या मुलांना त्यांच्या पतीने नाव देण्यास नकार दिला. यामुळे दोघे वेगळे झाले. सोहनलाल याना हार्ट अटॅक आल्यानंतर ते पुन्हा एकत्र राहू लागले. या दरम्यान, त्यांच्या मुलगी कुकूचा जन्म झाला. सरोज खान यांनी दोघांचे पालन पोषण एकट्यानेच केले.