या वर्षी इरफान खान, ऋषी कपूर, सुशांत सिंह राजपूत आणि सरोज खान यासारख्या बड्या कलाकारांनी निरोप घेतला आहे. सर्वांच्याच जाण्याने बॉलीवूड हळहळले. सरोज खान यांच्या जाण्याने तर पडद्यामागील सृष्टीलाही चटका लावला. सरोज खान यांच्यावर आधारीत बायोपिक बनवावा, अशी कल्पना आता पुढे येते आहे.
त्यासाठी आतापर्यंत कुणाल कोहली, कोरिओग्राफर डायरेक्टर बाबा यादव यांची पत्नी आणि कोरिओग्राफर रेमो डिसोझाच्या आईने हा बायोपिक करण्याची तयारी दाखवली आहे. पण सरोज खान यांना केवळ रेमो डिसोझा बरोबर काम करण्याची ईच्छा होती. कारण रेमो देखील आपल्यासारखाच झिरो ते हिरो बनला आहे. त्यामुळे आपला बायोपिक त्यानेच बनवावा, असे सरोज खान म्हणाल्या होत्या.
स्वतः सरोज खान यांची कन्या सुकैना हिने ही माहिती दिली आहे. याबाबत रेमो डिसोझाला विचारल्यावर त्यानेही सरोज खान यांच्या बायोपिकसंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली होती, हे मान्य केले. पण सरोज खान यांच्या अकाली एक्झिटमुळे बायोपिकचा विषय अर्धवट राहून गेला. आता त्याचा विचार आपण नक्की करू, असे त्याने सांगितले. सरोज खान यांचा बायोपिक जर रेमो डिसोझाने केला, तर सरोज खान यांची अंतिम ईच्छा पूर्ण केल्यासारखे होईल.