मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन झाले असून त्या 72 वर्षांच्या होत्या. सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील गुरु नानक रुग्णालात भरती करण्यात आलं होतं. गुरुवारी मध्यरात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागले आणि रात्री दोनच्या सुमारास उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, सरोज खाम यांची कोरोना चाचणीदेखील करण्यात आली होती. मात्र त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
सरोज खान यांनी श्रीदेवी, माधुरी दीक्षित आणि आलिया भट्ट या अभिनेत्रींसह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना डान्स शिकवला होता. त्यांनी आतापर्यंत जवळपास 2 हजारांहून अधिक गाण्यांची कोरियोग्राफी केली होती. कोरिओग्राफी करण्याआधी 50च्या दशकात सरोज खान बँकग्राउंड डान्सर म्हणून काम करत होत्या. 1974मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘गीता मेरा नाम’मध्ये त्यांनी कोरिओग्राफर म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांनी बॉविवूडच्या अनेक बड्या अभिनेत्रींना डान्स करायला शिकवले. मिस्टर इंडिया, चांदनी, बेटा, तेजाब, नगिना, डर, बाझीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, देवदास, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड, मणिकर्णिका, या आणि अशा अनेक गाजलेल्या सिनेमांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे.
सरोज खान यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. सरोज खान यांनी माधुरी दीक्षितचं सर्वात लोकप्रिय झालेलं गाणं ‘धक धक करने लगा’ हेदेखील कोरिओग्राफ केलं होतं. बेटा चित्रपटातील या गाण्यानंतर माधुरी दीक्षितला चाहते धक धक गर्ल म्हणून ओळखू लागले. त्यानंतर एक दो तीन या गाण्याने तर अक्षरशः देशात धुमाकूळ घातला होता. त्याच बरोबर ‘चोली के पिछे क्या है’ या गाण्याचेही कोरिओग्राफ त्यांनीच केले होते.
https://youtu.be/DqxIFvsLcRQ
https://youtu.be/8nd5NLbUu44
‘कलंक’ चित्रपटातील गाजलेलं गाणं ‘तबाह हो गए में’ हेदेखील सरोज खान यांनी कोरिओग्राफ केलं होतं. यामध्येही माधुरी दीक्षित परफॉर्म करताना दिसून आली होती. याव्यतिरिक्त त्यांनी याच चित्रपटासाठी आलिया भट्टलाही डान्स शिकवला होता.
चित्रपट ‘मिस्टर इंडिया’ मधील श्रीदेवी यांच्यावर दिग्दर्शित केलेलं सर्वात लोकप्रिय गाणं ‘हवा हवाई’ हेदेखील सरोज खान यांनी कोरिओग्राफ केलं होतं.
1991मध्ये रिलीज करण्यात आलेला चित्रपट ‘थानेदार’मधील लोकप्रिय गाणं ‘तम्मा तम्मा दे दे’ हेदेखील सरोज खान यांनी कोरिओग्राफ केलं होतं. हे गाणं आजही प्रेक्षकांना तेवढचं आवडतं.
https://youtu.be/zS06WdqxPGQ
शाहरुख खान, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय स्टारर चित्रपट देवदास यामधील गाणीही सरोज खान यांनी कोरिओग्राफ केली होती.
ऐश्वर्या रॉय आणि सलमान खान यांचा सुपरहिट चित्रपट हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील निंबुडा निंबुडा या गाण्याचेही नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांनीच केले होते.
https://youtu.be/YJzT1KMjQ0k