नवी दिल्ली : आशियाई कुस्ती स्पर्धेत गुरूवारी भारताच्या महिला कुस्तीपटू सरिता मोर(५९ किलो), पिंकी (५५ किलो) आणि दिव्या काकरन (६८ किलो) यांनी अंतिम फेरीत प्रतिस्पर्ध्यी खेळाडूवर विजय नोंदवित सुवर्णपदकाची कमाई केली आहे. यासह स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदकांची संख्या चार झाली आहे. दोन दिवसांपूर्वी सुनीलकुमारने ग्रीको-रोमननमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
Indian women completed a great day at the Asian Wrestling Championships with 3 gold and a silver. #SaritaMor (59 kg) and #Pinki (55 kg) won gold while #NirmalaDevi (50 kg) won silver. @DivyaWrestler had won gold earlier in the day.@KirenRijiju @DGSAI @FederationWrest @PIB_India pic.twitter.com/ZSgaaeEqyS
— SAI Media (@Media_SAI) February 20, 2020
दिल्लीतील खाशाबा जाधव बंदीस्त कुस्ती संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेत ५९ किलो वजनी गटात सरिताने अंतिम फेरीत मंगोलियाच्या बतसेतसेगवर ३-२ असा विजय मिळवला.
पिंकीने ५५ किलो वजनी गटात अंतिम फेरीच्या लढतीत मंगोलियाच्या दुलगुन बोलोर्मावर २-१ असा तर दिव्याने ६८ किलो वजनी गटात जागतिक ज्युनियर जगज्जेती नरूहा हिचा ६-४ ने पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
दरम्यान, दुसरीकडे निर्मला देवी हिला ५० किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये जपानच्या मिहो इगार हिच्याकडून २-३ असा पराभव पत्करावा लागल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.