पाकिस्तानी कर्णधार सर्फराजवर चार सामन्यांची बंदी

File photo

डर्बन  – दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू अँडील फेलूकव्हायोवर वर्णभेदी टिप्पणी करणे पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमदला महागात पडले आहे. याप्रकरणी आयसीसीने सर्फराज अहमदला दोषी ठरवत चार सामन्यासाठी निलंबित केले आहे. त्यामुळे सर्फराज अहमद मालिकेतील उर्वरित दोन एकदिवसीय सामने आणि दोन टी-20 सामने खेळू शकणार नाही. आता चार सामन्यांसाठी पाकिस्तानची धुरा शोएब मलिककडे सोपवण्यात आली आहे.

सर्फराज अहमदने याप्रकरणी अँडील फेलूकव्हायो यांची माफी मागितली होती आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेन संघाने त्याला माफ देखील केले होते, पण आयसीसीने त्याला शिक्षा केली. यावेळी दुसऱ्या सामन्या दरम्यान पाकिस्तानच्या 204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचे तीन फलंदाज 29 धावांमध्येच माघारी परतले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, 5 बाद 80 अशा धावांवरून डुसेर आणि फेलुक्वायो यांनी आफ्रिकेचा डाव सावरला आणि संघाला विजय मिळवून दिला. सामन्याच्या 37 व्या षटकात सर्फराजने केलेली वर्णद्वेषी टिप्पणी स्टम्प्समधील माइकमध्ये रेकॉर्ड झाली आणि वादाचा भडका उडाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)