सरफराज कर्णधारपदावरून पायउतार; पीसीबीनेच उडवली खिल्ली 

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या टी-२० आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन सरफराज अहमदला काढण्यात आले आहे. ही कारवाई पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) शुक्रवारी संध्याकाळी केली. यानंतर काही कालावधीतच पीसीबीने एक व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर अपलोड केला. या व्हिडीओत खेळाडू डान्स करताना दिसत आहे. यावरून पीसीबीला पाकिस्तानी क्रिकेट फॅन्सने चांगलेच ट्रोल केले. पीसीबीची चूक लक्षात येताच व्हिडीओ हटवत ट्विटरवरून माफी मागितली.

सरफराजच्या पायउतार होण्याची बातमी माध्यमांमध्ये आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर, पाकिस्तानी खेळाडू नाचत असल्याचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला. काही क्षणांमध्येच आपली चूक लक्षात आल्यानंतर पाक क्रिकेट बोर्डाने आपले ट्विट हटवले आणि माफी मागितली. पीसीबीने म्हंटले कि, हा व्हिडीओ एक वर्ष जुना असून चुकीच्या कालावधीत तो प्रसिद्ध करण्यात आला. यासाठी आम्ही खेद व्यक्त करत आहोत, असे त्यांनी ट्विट केले.

दरम्यान, २०१९ इंग्लंड विश्वचषकातही पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता आली नाही. तसेच श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेतही पाकिस्तानला ०-३ ने पराभव स्वीकारावा लागला. सरफराज अहमदची टी-२० आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या टी-२० संघाची धुरा बाबर आझम याकडे सोपविण्यात आली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली आगामी काळात पाकिस्तानचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)