#CWC19 : पाकिस्तानमध्ये जायला घाबरतोय सर्फराज

मॅंचेस्टर – भारताविरुद्ध विश्‍वचषकात सलग सातव्यांदा पराभूत झालेल्या पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार सर्फराज अहमद आता आपल्या मायदेशी म्हणजे पाकिस्तानमध्ये जाण्यास घाबरत आहे. याची कबुली खुद्द त्याने प्रसारमाध्यमांसमोर दिली आहे.

भारताविरुद्धच्या सामन्यानंतर “द न्यूज डॉट कॉम डॉट पीके’ या संकेतस्थळाला मुलाखत देताना सर्फराज म्हणाला की, जर कुणी असा विचार करत असेल, की मी पाकिस्तानमध्ये जाईन, तर ते चुकीचे ठरेल. कारण जर काही विपरीत घडणार असेल, तर मी का पाकिस्तानमध्ये जायचे. भारता विरुद्धचा पराभव विसरून अन्य चार सामन्यांमध्ये आम्हाला चांगले प्रदर्शन करावे लागेल. तत्पूर्वी भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचे खेळाडू इंग्लंडमधील हुक्का पार्लरमध्ये दंगा करत होते, त्यामुळे आधीच त्यांचा संघ टीकेचा धनी होत असताना पुन्हा भारताविरुद्ध त्यांना मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागल्याने संघातील खेळाडू दडपणात असल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.