मुंबई – नऊवारी साडी नेसून स्कायडायव्हिंगचे विविध विक्रम केलेली पुण्याची शितल महाजन सर्वांना माहिती आहे. मात्र, प्रत्यक्ष ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये केले जाणारे जिम्नास्टिक्सचे प्रकार साडी नेसूनही यशस्वीपणे करणारी पारुल अरोराला तुम्ही भेटला नसाल. आपले गुरु मायकेल सिंग यांच्याकडून जिम्नास्टिक्सचे धडे घेतलेली पारूल साडी नेसूनही या सर्व कसरती उत्तमरित्या कशी काय करते, हे पाहून तुम्हीही थक्कच व्हाल.
https://twitter.com/Aparna/status/1347195182484082695
नवी दिल्लीची रहिवासी असलेली पारूल जिम्नास्टिक्सची राष्ट्रीय विजेती अर्थात गोल्ड मेडालिस्ट असून तिचे साडी नेसून विविध कसरती करणारे व्हिडीओज अभिनेत्री विद्या बालनने प्रकाशात आणले. आता हे व्हिडीओज सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत असून युट्युबसह अनेक सोशल मिडीया साईट्सवर या व्हिडिओजना लाखाच्या पुढे व्हुज आणि लाईक्स मिळत आहेत.