अर्जुन कपूरचा “सरदार का ग्रॅंडसन’ हा आगामी सिनेमा 18 मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी याचा ट्रेलरदेखील रिलीज केला आहे. यामध्ये अर्जुन कपूर अमेरिकेतून परतलेला एक तरुण दिसतो आहे. सरदार अर्थात नीना गुप्ता ही एका शीख कुटुंबाची प्रमुख महिला असेल आणि अर्जुन तिचा नातू असेल.
या सिनेमात अर्जुन आणि नीना गुप्ता व्यतिरिक्त रकुल प्रीत सिंग, आदिती राव हैदरी, जॉन अब्राहम, सोनी राजदान, कंवलजीत सिंह आणि कुमूद मिश्रा हे देखील असणार आहेत. डायरेक्टर काशिव नायर यांनी यापूर्वी निखिल अडवाणीला “डी-डे’ साठी सहाय्यक डायरेक्टर म्हणून काम केले होते.
त्यानंतर “पीओडब्लू-बंदी युद्ध के’ या टिव्ही सिरीयलचे सहदिग्दर्शक म्हणूनही काम केले होते. “सरदार का ग्रॅंडसन’ ही कथा आजीच्या पिढीची इच्छा नातवांनी पूर्ण करण्याची कथा आहे. एकत्र कुटुंबातील नातेसंबंध आणि परस्परांकडील अपेक्षांचे नाते या सिनेमात बघायला मिळणार आहे.