“सारथी’ संस्थेला मिळाली हक्‍काची जागा

आगरकर रस्त्यावरील बालभरती चौकातील एक एकर जागा देण्याचा निर्णय

 

पुणे – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला (सारथी) हक्‍काची जागा मिळाली आहे. राज्य शासनाने आगरकर रस्त्यावरील बालभरती चौकातील एक एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

“सारथी’ ही संस्था राज्यातील मराठा, कुणबी व कुणबी-मराठा या समाजाचा शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक विकास करणे या उद्दिष्टांकरिता स्थापन झाली आहे. “सारथी’ ही संस्था नियोजन विभागांतर्गत येते. नियोजन विभाग हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. पवार यांच्याकडे “सारथी’ संस्थेची जबाबदारी आल्यापासून संस्थेचे प्रश्‍न मार्गी लागल्याचे दिसत आहे.

यामध्ये प्रामुख्याने प्रलंबित असलेला निधी मिळाला आहे. तसेच, संस्थेला हक्‍काची जागा देण्यात आली आहे. आगरकर रस्त्यावरील ही जागा शिक्षण विभागाच्या अख्यात्यारित येते. सुमारे एकूण 8 हजार 327 चौरसमीटर इतकी जागा आहे. यातील “सारथी’ संस्थेस निम्मी म्हणजे 4 हजार 16 चौरस मीटर इतकी जागा मिळणार आहे.

तर, उर्वरित 4 हजार 163 चौरस मीटर इतकी जागा शिक्षण विभागाकडेच राहणार आहे. दरम्यान, “सारथी’ संस्थेचे मुख्य कार्यालय, अभ्यागत कक्ष, अभ्यास केंद्र, अभ्यासिका, सभागृह, कॉन्फरन्स हॉल आदी या जागेमध्ये उभारण्याचे नियोजन आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.