मुंबई – नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने भारतासह परदेशात देखील सिनेरसिकांची मने जिंकली आहेत. चित्रपटात परशाची भूमिका वठवून रातोरात स्टार झालेला आकाश ठोसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान, सैराट फेम परश्याला बॉलिवूडचा बाजीराव अर्थात अभिनेता ‘रणवीर सिंह’ सिंहसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. आकाश ठोसरला सेट-वेटची जाहिरात मिळाली असून त्यात तो रणवीर सिंहसोबत दिसत आहे.
आकाशने या जाहिरातीचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर अपलोड केला असून, ‘सदा सेक्सी रहो’ असं कॅप्शन देत रणवीर सिंहलाही टॅग केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आकाशच्या मेक ओव्हरची चर्चा आहे. त्यानं हा लूक कशासाठी केलाय हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
View this post on Instagram
Sada Sexy Raho Man? @ranveersingh @rajeshsaathi @setwetstyling @keroscenefilms @aalimhakim #setwet