बॉलीवूडमध्ये अभिनेत्री सारा अली खानने आपले एक वेगळे विश्व निर्माण केलेले आहे. तिच्या अभिनयासह हाजिरजवाबीचेही तिचे चाहते कायल आहेत. त्यामुळेच तिच्या प्रत्येक अपडेट्सची चाहत्यांना उत्सुकता असते. साराने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिच्या हॉट लुकमुळे चाहते तिच्यावर फिदाच झाले आहेत.
सारा अली खानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाल रंगाच्या ड्रेसमधील एक फोटो पोस्ट केला आहे. यात रेड नेल नेंटसह मोठ्या आकाराच्या इयररिंग्समध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करत साराने वेगवेगळ्या इमोजी पोस्ट केल्या आहेत. या फोटोत ती खुपच हॉट दिसतेय.
दरम्यान, सारा अली खानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास ती लवकरच इम्तियाज अली यांच्या रोमांटिक चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत झळकणार आहे. याशिवाय ती डेविड धवन यांच्या आगामी “कुली नंबर 1’च्या रीमेकमध्ये काम करणार आहे. यात वरुण धवनसोबत ती धम्माल करणार आहे.