‘सारंग’ चित्तथरारक कसरतींनी चुकवला हृदयाचा ठोका

पुणे – “एनडीए’च्या दीक्षांत संचलनानिमित्त भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील “सारंग’ हेलिकॉप्टरने चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकविला. सुदान ब्लॉकच्या मागून भिरभिर हेलिकॉप्टर येताच उपस्थितीतांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी प्रत्येकाच्या नजरा निळ्याशार आकाशात खिळल्या होत्या. धूर सोडत वेगाने “सारंग’ची चार हेलिकॉप्टर सुदान ब्लॉकच्या समोरिल आकाशात एक-एक कसरती दाखवू लागली.

सुरवातीलाच या चारही हेलिकॉप्टर्सनी आकाशात “इंडिया फॉर्मेशन’ केले. हे फॉर्मेशन आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात टीपण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असल्याचे चित्र दिसत होते. हवेतल्या हवेत गिरकी घेणे, आकाशात सरळ उंच भरारी मारणे, प्रचंड वेगाने एकमेकांसमोर अशा प्रकारचे ही हेलिकॉप्टर्स येत होती की, आता ती धडकणार असा विचार मनात येईपर्यंत ती व्यवस्थित एकमेकांना ओलांडून पुढे तितक्‍याच वेगाने निघून जात होती. अशा अनेक कसरती या चार हेलिकॉप्टर्सच्या “टीम’ने सादर केली. हिंदुस्थान एअरोनॉटिक्‍स लिमिटेडने विकसित केलेल्या “ध्रुव’ या देशी बनावटीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज “लाइट हेलिकॉप्टर’च्या माध्यमातून या कसरती सादर केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.