सारा अली खान सध्या बॉलीवूडमधील सर्वाधिक डिमांड असलेली ऍक्ट्रेस आहे. आतापर्यंत साराचे केवळ दोन सिनेमे हिट झाले आहेत. पण सारा ऑलरेडी स्टार बनली आहे. सारा स्वतःच एका सेलिब्रिटी फॅमिलीमधील असल्याने तिला ग्लॅमर लहानपणापासून माहिती आहे. तिचे आजोबा स्टार क्रिकेटर होते. आजी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आई, वडील आणि दुसरी आई हे तिघेही बॉलीवूडमधील प्रस्थापित ऍक्टर आहेत. आता एवढी मोठी पार्श्वभूमी असलेल्या मुलीला वशिलेबाजी म्हणजे काय, हे कसे समजणार. याशिवाय “केदारनाथ’ आणि “सिंबा’ दोन्ही मध्ये साराने केलेल्या कामाचे सगळ्यांकडून कौतुकच झाले आहे. तिने हे रोल वशिल्यावर मिळवले असे कोणीही म्हणू शकत नाही. तिच्या टॅलेंटला नक्कीच दाद द्यायला लागेल.
कोलंबिया विद्यापीठातून पदवी मिळवलेल्या साराने अभिनयाच्या “होमवर्क’ला पूर्वीपासूनच सुरुवात केली होती. तिने लहानपणापासून स्वतःचे व्हिडिओ तयार केले होते. पण डायरेक्टरकडून मार्गदर्शन मिळणे आणि त्याने केलेल्या सूचनांनुसार स्वतःचा रोल फुलवणे हे ती आता शिकली आहे.
तिला आनंद एका वेगळ्याच गोष्टीचा वाटतो आहे. अभिनय क्षेत्रात खूप कष्ट घ्यायला लागतात, असे तिने ऐकले आहे. झोप, आहार, व्यायाम या सगळ्याचे काटेकोर नियोजन करायला लागते आणि ते पाळायलाही लागते. पण साराला यापैकी कोणत्याही गोष्टीचे बंधन कधीच जाणवले नाही. तिला जे करावेसे वाटते ते तिने मनमुरादपणे केले आहे. आता आपल्या या आनंदामध्ये अभिनयाच्या आनंदाची भर तिला घालायची आहे. खान फॅमिलीला बॉलीवूडमध्ये ग्लॅमर असले तरी तिला आता आपल्या आईसोबत म्हणजे अमृता सिंहसोबत रहायचे आहे. आईपासून साराने काहीही लपवून ठेवलेले नाही. पण आई ही अशी एकच व्यक्ती आहे, जिची साराला भीती वाटते आहे.