पुणे- वाहन चोरी, घरफोडी आणि सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेल्या दोघांना खडक पोलिसांनी पुन्हा एकदा चोरीच्या प्रयत्नात असताना पकडले. त्यांना खडीमशीन चौकात फिल्मी स्टाईल पाठलाग करुन पकडण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीच्या तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आत्तापर्यंत त्यांच्याकडून तीन लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सोन साखळी चोरण्यासाठी ते आले होते.
सचिन नरहरी पेशवे (वय 36) आणि प्रेम शालीकराम खत्री (वय 29 दोघेही सध्या रा. येवलेवाडी, मूळ रा. नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांनी नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार 13 ऑक्टोंबर रोजी एक वृद्ध महिला मॉनिंगवॉक करत शुक्रवार पेठ येथून जात होती. त्यावेळी पाठीमागून गाडीवर आलेल्या दोघांनी त्यांची सोनसाखळी चोरली . या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेत असताना पोलिस कर्मचारी अमेय रसाळ, समीर माळवदकर व बंटी कांबळे यांना पेशवे व खत्री खडी मशिन चौकातून दुचाकीवरून सारखे ये-जा करीत असताना दिसून आले. त्यामुळे खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव व पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सापळा लावून दोघांना अटक केली. खडी मशिन चौकातून दोघांना ताब्यात घेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने त्यांना पाठलाग करून पकडले. पोलिस तपासात त्यांनी शुक्रवार पेठ, निगडी आणि चिंचवड येथे वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याचे सांगितले. सोन्याचे दागिने आणि गुन्ह��
[7:04 PM, 10/21/2020] Sanjay Kadu Prabhat Crime: करण्यासाठी वापरलेली दुचाकी असा एकूण तीन लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत. तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सुशील बोबडे, पोलिस कर्मचारी अजीज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते, संदीप पाटील, सागर केकाण, रवी लोखंडे, रोहन खैरे आणि योगेश जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पेशवेवर 39 व खत्रीवर 10 गुन्हे दाखल
पेशवे हा नागपूर, अमरावती जिल्ह्यातील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी आहे. त्यावर आतापर्यंत 39 गुन्हे दाखल असून तो दीड महिन्यापूर्वी नागपूर कारागृहातून चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आला आहे. तर खत्री हा नागपूर, मध्यप्रदेश येथील वाहनचोरी व घरफोडी गुन्ह्यातील आरोपी असून त्यावर 10 गुन्हे दाखल आहे. खत्री हा 2015 साली नागपूर सेन्ट्रल जेलमधून पळाला होता. त्या गुन्ह्यात झालेली शिक्षा भोगून तो चार महिन्यापूर्वी बाहेर आला आहे.