बॉलिवुडमधील युवा आणि क्युट अभिनेत्रींपैकी सारा अली खान ही एक अभिनेत्री आहे. तिने “केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवुडमध्ये डेब्यू केले होते. या चित्रपटाला नुकतेच 1 वर्ष पूर्ण झाले आहे. हा चित्रपट गतवर्षी 7 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. तसेच क्रिटिक्सनेही तिची भरभरून स्तुती केली होती.
म्हणूनच कदाचित चित्रपटाशी संबंधित जुन्या आठवणी सारासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तिने तिच्या अशा काही आठवणी इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. तिने चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती “ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील “बदतमीज दिल’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
या चित्रपटात गाण्याचे एक दृश्य होते, परंतु व्हिडिओमध्ये सारा तिच्या हुकअपच्या स्टेप शिकताना दिसत आहे. यात केदारनाथच्या शूटचे आणखीही अनेक फुटेज आहेत. केदारनाथला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त साराने इंस्टाग्रामवर एक पत्रही पोस्ट केले आहे. यात चित्रपटाच्या कलाकार व तेथील लोकांचे आभार मानले आहेत.
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, यापूर्वी सारा “सिंबा’ चित्रपटात झळकली होती. यात तिच्यासोबत रणवीर सिंहने मुख्य भूमिका साकारली होती. आता ती कार्तिक आर्यनसोबत इम्तियाज अली यांच्या चित्रपटात आणि वरुण धवनसांबत “कुली नंबर 1’मध्ये दिसणार आहे.