मुंबई – सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अडचणीत आलेल्या रिया चक्रवर्तीला कमबॅक करण्यासाठी खूप खटपट करावी लागली. तिला खूप टीका सहन करावी लागली. एवढेच नाही तर तुरुंगातून आल्यावर तिच्या प्रोफेशनल लाइफवरही खूपच परिणाम झाला.
View this post on Instagram
सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणातील चौकशीत बॉलीवूडमधील ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणी एनसीबीने रिया चक्रवर्ती सह आघाडीच्या अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांची सुद्धा चौकशी केली होती.
View this post on Instagram
ड्रग्ज प्रकरणी चौकशीच्या फे-यात अडकलेली सारा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह सोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आले होते. साराने एनसीबी चौकशीत सुशांतला डेट करत असल्याचे स्वीकार केले असून तिने ब्रेकपचेही कारण सांगितले होते.
View this post on Instagram
याचदरम्यान एनसीबी चौकशीत त्यांचा रिलेशनशिपबाबत रिया चक्रवर्तीने काही खुलासे केले होते. सुशांत सिंग राजपूत ड्रग्स प्रकरणात एका मीडिया चॅनेलला रियाची चार्जशीट मिळाली होती. ज्यात साराच्या नावाचाही उल्लेख होता.
View this post on Instagram
या चार्जशीटमध्ये रियाने म्हटले की, सारा स्वतःच्या हाताने गांज्याची सिगरेट सर्व्ह करत होती. यापूर्वी जेव्हा एनसीबीच्या टीमने बॉलिवूड कलाकारांची चौकशी केली तेव्हा सारा अली खानचे नाव समोर आले होते. मात्र तिची चौकशी केली होती तेव्हा तिने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. रियाचे म्हणणे आहे की सारा स्वतः त्यांना ड्रग्स ऑफर करत होती. दरम्यान, रिया चक्रवर्तीने एनसीबी समोर स्टेटमेंट दिले होते, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.