मुंबईत साराचे मध्यरात्री “सायकलिंग’

बॉलीवूडमध्ये “केदारनाथ’ चित्रपटातून यशस्वीपणे पदार्पण करणारी साराचा नुकताच प्रदर्शित झालेल्या “सिंबा’ चित्रपटानेही चांगला गल्ला कमविला होता. सध्या ती आगामी चित्रपटांच्या तयारीत आहे. दरम्यान, साराला मुंबईत चक्‍क सायकलिंग करताना पाहण्यात आले आहे. तिचे सायकलिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी सारासोबत तिचा भाऊ इब्राहिम खानही होता.

बॉलिवूडमध्ये साराने आपल्या साधेपणामुळे अल्प कालावधीतच स्वःताचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. साराने यावेळी पिवळ्या रंगाचा पायजमा आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. साराला तिच्या फिटनेसबद्दल विचारले असता म्हणाली, मी रोज सकाळी व्यायाम केल्यांतर हळद, कोबी आणि गरम पाणी पिते. पण, मला मांसाहार खूपच आवडतो. तसेच चायनीज पदार्थही आवडतात.

दरम्यान, सारा आणि सुशांत सिंग राजपूत एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दोघेही एकत्र मीडियासमोर सहसा येत नाहीत. मात्र दोघे एकमेकांसोबत स्पेशल बॉण्डिंग शेअर करतात.सुशांतच्या वाढदिवसाला आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळात वेळ काढून सारा रात्री त्याच्या घरी शुभेच्छा द्यायला गेली होती. तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.