सैफअली खान आणि अमृता सिंगची कन्या सारा अली खानने कमी वेळात बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या सारा आनंद एल रायच्या एका आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सारा एका बिहारी तरुणीची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
चित्रपटात ती भोजपुरी बोलतानाही दिसून येणार आहे. 2013 मध्ये हिंदी सिनेसृष्टीला “रांझणा’सारखा हिट चित्रपट देणाऱ्या आनंद एल राय आणि धनुष यांच्या जोडीसोबत सारा काम करत आहे.
या चित्रपटात अक्षयकुमारचीही महत्त्वाची भूमिका असल्याचे समजते. अन्य कलाकारांबाबत अद्याप पूर्ण माहिती समोर आलेली नाही. मात्र हा एक कॉमेडी आणि रोमॅंटिक चित्रपट असेल.
सारा आपल्या करिअरच्या सुरुवातीला काही एक्स्प्रिमेंट करुन पाहत आहे. तसेच आपल्या लूकचा मेकओव्हरही तिला करायचा आहे. बिहारी तरुणी साकारण्याच्या निमित्ताने ती नव्या लूकमध्ये दिसणार आहे. व्यक्तिरेखा वास्तववादी वाटावी यासाठी सारा सध्या बिहारी भाषेचे खास प्रशिक्षणही घेत आहे. तिची ही मेहनत फळाला येते का येणाऱ्या काळात पाहायचे.