सारा अली खानचा न्यूयॉर्कमध्ये एन्जॉय

“आज कल’ चे शुटिंग संपवल्यानंतर सारा अली खान सर्व फॅन्सच्या नजरेपासून दूर न्यूयॉर्कमध्ये एन्जॉय करायला निघून गेली आहे. तिच्या समवेत तिचे काही निवडक मित्रमंडळीदेखील आहेत. तिने आपल्या या सुटीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यातील कॅप्शनमध्ये तिने आपल्या सुटीचा प्लॅन आणि एन्जॉयमेंटचे अनुभवही शेअर केले आहेत. स्वप्नांच्या शहरामध्ये मी फिरते आहे.

या सुटीचे नियोजन एका वेबसाईटने आहे. आमच्या सुटीच्या सर्व नियोजनासाठी या साईटला तिने खूप खूप धन्यवाद दिले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एक फोटो अमेरिकेतील व्हिटनी शहरातील संग्रहालयाबाहेरील, तर दुसरा फोटो बर्डिक चॉकलेटचा आणि तिसरा फोटो साहो लाडुरेचा आहे. तिने मॅनहटनमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला आहे. तिथून एम्पायर स्टेट बिल्डींगचा भव्य नजारा सहजच डोळ्यात भरतो आहे. तिचा “आज कल ‘पुढच्या वर्षी व्हॅलेंटाईन डे च्या सुमारास रिलीज होणार आहे. आता सुटी संपवल्यानंतर ती गोविंदाच्या “कुली नं 1’च्या रिमेकच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. यामध्ये तिच्यासमवेत वरुण धवन असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.