सारा अली खान आणि कार्तिकची केमिस्ट्री

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनमधील केमिस्ट्रीवरील गॉसिप ते दोघे मिळण्यापूर्वीपासूनच सुरू झाले होते. कार्तिक आर्यनबरोबर डेटला जायला आवडेल, असे जेंव्हा सारा म्हणाली होती, तेंव्हापासूनच त्यांच्यातील ऑफस्क्रीन केमिस्ट्री किती छान असेल, याचा अंदाज करायला सुरुवात झाली होती. आता तर सारा आणि कार्तिक एका सिनेमात एकत्र काम करत आहेत. त्यामुळे त्यांचे एकत्र हिंडणे, फिरणे, हसणे, खिदळणे आदी गोष्टींचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल व्हायला लागले आहेत. त्यामुळे या दोघांची केमिस्ट्री अधिक चांगली जुळली असल्याचे नवीन गॉसिप सुरू झाले आहे.

अशाच एका व्हिडीओमध्ये सारा कार्तिकचे नाव ओरडून घेते आणि त्याची प्रतिक्रिया बघून हसायला लागते, असे दिसते आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये बाईकवर दोघेही लॉंग ड्राईव्हला गेलेलेही दिसते आहे. सारा आणि कार्तिक सध्या “लव्ह आज कल 2’मध्ये काम करत आहेत. त्याचे शुटिंगही सध्या जोरात सुरू आहे. “लव्ह आज कल 2′ हा सारा अली खानचा तिसरा सिनेमा असणार आहे. यापूर्वी सुशांत सिंह राजपूतबरोबर “केदारनाथ’ आणि रणवीर सिंह बरोबर “सिंबा’मध्ये तिच्या कामाचे खूप कौतुक झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.