बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला सतत चर्चेत कसे राहायचे हे चांगलेच माहिती आहे. यासाठी ती सोशल मीडियाचा उत्तम पद्धतीने वापरही करत असते. आताही तिने लॉकडाऊनदरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर आपल्याला हसणे थांबविणे खुपच कठीण आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत भाऊ इब्राहीम खान देखील आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
Throwback to when you could… 👊🏻👊🏻🚪😹👏🏻🐣🐥 But for now #stayhome #staysafe and don’t go knocking🚫❌‼️
सारा अली खान ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती आपल्या चाहत्यांसाठी वेळोवेळी फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असते. तसेच भाऊ इब्राहीमबरोबरही ती सतत दिसते. लॉकडाऊनमुळे साराही सर्व वेळ घरीच व्यतीत करत असताना तिने हा सुंदर व्हिडीओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. “नॉक-नॉक’ विनोदांवर तयार केलेला हा व्हिडीओ चाहत्यांना खूपच आवडला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करताना साराने चाहत्यांना सांगितले की, ही वेळ बाहेर जावून नॉक-नॉक करण्याची नाही. घरी राहा आणि सुरक्षित राहा.
या व्हिडीओमध्ये सारा नॉक… नॉक असे म्हणताना दिसते. तेव्हा इब्राहीम विचारतो, कोण? सारा म्हणते, कोणीही. त्यावर इब्राहीम विचारतो “कोणीही म्हणजे कोण. आता सारा येथे एक मजेदार स्वरात म्हणते, तू जर काही केले तर मी तुझ्यापेक्षा चांगले करेन. साराचे हे उत्तर ऐकल्यावर इब्राहीमला काहीच समजत नाही आणि सारा हसू लागते. याप्रसंगी दोघांचा चेहरा पाहण्यासारखा आहे.