पुणे – सातारा येथील एका सराफास पुण्यातील कारागिराने 13 लाखाचा गंडा घातला आहे. दागिने बनवून देण्यासाठी दिलेले सोने घेऊन कारागिराने पळ काढला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी अकबर उर्फ अतर रफीक मलीक(36) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी अभिजीत घोडके(40,रा.शुक्रवार पेठ, सातारा) यांचा दागिण्यांची ऑर्डर घेऊन ते विकण्याचा व्यवसाय आहे. त्याने ऑर्डर घेतलेले दागिने बनविण्यासाठी सोन्याचे बिस्कीट, सोन्याची गोळी आणि मणी असे 12 लाख 92 हजाराचे सोने अकबर याला दिले होते. अकबरने 22 मार्च रोजी हे सोने घेतल्यावर अद्याप पर्यंत दागिने बनवून दिले नाही. यानंतर त्याने तो रहात असलेल्या ठिकाणाहून पळ काढला.
आरोपी मुळचा पश्चिम बंगालचा आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील करत आहेत.