सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला आता 3 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. त्याच्या मृत्यूमुळे चित्रपटसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमाविला आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी आणि व्हिडिओ आता समोर येत आहे. यात सारा अली खानसोबतचाही एक व्हिडिओ समोर आला आहे.
यात सारा सुशांतला केव्हा भेटली आणि ती त्याच्यावर का फिदा झाली होती, हे दाखविण्यात आले आहे.
या व्हिडिओत सारा असे सांगते की, तिने सुशांतला मैं तेरा बॉयफ्रेंड या गाण्यात पाहिले होते आणि गाण्यातील ना-ना-ना-ना या त्याच्या ऍक्शनवर मी तर फिदाच झाले. तो मला खूपच हॉट वाटला आणि मी त्याला भेटण्यासाठी आतूर झाले. सारा म्हणाली, मी सुशांतचे ऍब्स पाहतच राहिले.
दरम्यान, सुशांत आणि सारा यांनी केदारनाथ चित्रपटात एकत्रित काम केले होते. या चित्रपटातून साराने बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. या चित्रपटानंतर सुशांत आणि साराच्या लिंकअपची चर्चाही रंगल्या होत्या. साराही अनेकवेळा सुशांतच्या फॉर्महाउसवर येत होती.