अभिनेत्री सारा अली खान ही सध्या लॉकडाऊनच्या काळात चाहत्यांसाठी सतत फोटो शेअर करत आहे. अलीकडेच एका फोटोमध्ये साराचे ट्रान्सफॉर्मेशन दिसून आले. हा फोटो कोलाज असून त्यात तिच्याबरोबर तिची आई आणि भाऊ देखील दिसतो.
कोलाजच्या पहिल्या फोटोत ती हेल्दी दिसत आहे तर दुसऱ्या छायाचित्रात तिचे ट्रान्सफॉर्मेशन दिसत आहे. अन्य एका फोटोते सारा स्लिम दिसते. वर्कफ्रंटचा विचार केल्यास सारा अली खान ही वरुण धवनबरोबर फिल्म कुली नंबर वनमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट एक मे रोजी रिलिज होणार होता, परंतु लॉकडाउनमुळे त्याची तारीख पुढे ढकलली आहे.