बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव असते. सारा आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. साराने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहेत. या फोटोमध्ये साराच्या मांडीवर लहान मुलगी बसलेली दिसत आहे.
View this post on Instagram
ही मुलगी नेमकी कोण याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. साराच्या मांडीवर बसलेली ही मुलगी म्हणजे साराची आत्ते बहीण इनाया आहे. इनाया ही अभिनेता कुणाल खेमू आणि साराची आत्या सोहा अली खान यांची मुलगी आहे.
View this post on Instagram
साराने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, आम्ही बहिणी-बहिणी आमच्या फॅमिली ट्रीची गोड फळं आहोत आणि कायम राहू. साराचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास ती अखेरच्या वेळी ‘कुली नंबर 1’मध्ये झळकली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. सारा लवकरच दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ मध्ये अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसणार आहे.