‘सारा’ आली मायदेशी परत मात्र अनवाणी…

सारा अली खान आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिमबरोबर काही दिवसांपूर्वीच मालदीवला गेली होती. मात्र कालच ती मुंबईच्या एअरपोर्टवरून बाहेर पडताना दिसली आहे. याचा अर्थ ती मालदीववरून भारतात परत आली आहे.

जान्हवी कपूर देखील मालदीवला गेली होती. ती ज्या हॉटेलमध्ये राहिली होती, तेथेच साराही राहिली होती. या दोघींचा एकत्र व्यायाम करतानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. सारा विमानतळावरून बाहेर पडली तेव्हा तिने अगदी शॉर्ट ड्रेस घातला होता. मालदीवला जातानाही तिने असाच शॉर्ट ड्रेस घातला होता. तिने व्यवस्थित मास्क, फेसशील्ड घातले होते.

तिने तर एका फॅनला सेल्फी देण्यासही नकार दिला. मालदीवला एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी जायला लागले होते. म्हणून मालदीवने भारतीय पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातल्यामुळे साराला परत यायला लागले असावे. तिच्या व्यतिरिक्त टायगर श्रॉफ, दिशा पाटणी, आलिया भट, रणबीर कपूर यांनाही मालदीववरून परत यावे लागले आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.