सारा अली खानची मालदिवमध्ये सुट्टी

गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडमधील सेलिब्रिटी मालदिवला सुट्टी एन्जॉय करायला जात आहेत. तापसी पन्नू, वरुण धवन, टायगर श्रॉफ, काजल अगरवाल, कतरिना कैफ आदी सर्वच जण मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करायला गेले होते.

आता सारा अली खानदेखील मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे. तिने सोशल मीडियावर या सुट्टीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. साराचे हे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहेत. “कुली नं 1′ आणि “अतरंगी रे’चे शूटिंग संपवल्यावर कामाचा थकवा घालवण्यासाठी ती मालदिवला रवाना झाली आहे. इन्स्टाग्रामवर साराला 29 मिलीयन फॉलोअर्स आहेत.

सारा नेहमीच इस्टाग्रामवर आपले फ्रेश फोटो अपडेट करत असते आणि फॅन्सना खूष ठेवत असते. आपल्या नवीन सिनेमांमधील लूक आणि शूटिंगमधील गमती जमती देखील ती अपडेट करत असते. साराने आतापर्यंत “केदारनाथ’, “सिंबा’, “लव आजकल’ आणि “कुली नं 1′ हे चार सिनेमे केले आहेत. मात्र, तिची फॅन फॉलोअर्सची संख्या पाहता तिने डझनभर सिनेमे केले असावेत असे वाटते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.