सारा अली खान सध्या “द इमॉर्टल अश्वत्थामा’साठी विशेष ट्रेनिंग घेते आहे. पण याच दरम्यान सारा जखमी झाली आहे.
View this post on Instagram
तिच्या नाकाला दुखापत झाली आहे. नाकावर पट्टी बांधलेल्या अवस्थेत तिने एका व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून ही गोष्ट सांगितली. तिने वडील सैफ अली खान, आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम यांची माफीदेखील मागितली आहे.
View this post on Instagram
“मी नाक कापले,’ असे ती म्हणाली. हे सांगितल्यावर तिने नाकावरची पट्टी काढली. तिच्या नाकावर खोल घाव स्पष्ट दिसतो आहे. नाक सुजलेदेखील आहे आणि रक्तस्रावदेखील झाला आहे. मात्र ही जखम कशी झाली हे मात्र तिने सांगितले नाही. तिचा व्हिडिओ बघितल्यावर तिचे फॅन्स तिची चौकशी करायला लागले.
View this post on Instagram
“द इमॉर्टल अश्वत्थामा’च्या शूटिंगमध्ये बिझी असलेली सारा या सिनेमातून प्रथमच ऍक्शन रोल करणार आहे. मात्र, यासाठी तिने काय ट्रेनिंग घेतले आहे, हेदेखील समजू शकलेले नाही.
View this post on Instagram
ती सेटवर जखमी झाली की ट्रेनिंगदरम्यान जखमी झाली हे पण तिने सांगितले नाही. या सिनेमात तिच्याबरोबर विकी कौशल लीड रोलमध्ये दिसणार आहे. अलीकडेच म्हणजे 1 ऑगस्टला या सिनेमाचे शूटिंग सुरू होणार होते.