सारा अली खानने केला रिक्षातून प्रवास

सारा अली खानला जर मुंबईच्या रस्त्यांवर रिक्षातून हिंडताना बघितले तर आश्‍चर्यचकीत होण्याची काही गरज नाही. कारण खुले आम रिक्षातून प्रवास करण्यात साराला काहीच वाटत नाही. काही दिवसांपूर्वी एका वर्कआऊट सेशनसाठी ती रिक्षातून गेली होती. हे त्यावेळी रस्त्यावरच्या तमाम पब्लिकने बघितले होते. त्यावेळी साराच्या बरोबर सेलिब्रिटी स्टायलिस्ट तान्या घावरी देखील होती. या दोघी रिक्षातून बाहेर पडल्या. त्यानंतर तान्याने रिक्षा ड्रायव्हरकडून सुट्टे पैसे घेतले आणि मग सारा आणि तान्या मजेत हसत खिदळत तिथून निघून गेल्या, असा एक छोटासा व्हिडीओ कोणीतरी मोबाईलमध्ये शुट केला आहे आणि सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे.

या वर्कआऊट सेशनसाठी साराने “विलेट्‌स गर्ल’ असे स्लोगन असलेली काळी शॉर्ट घातली होती. साराने बाजारामध्ये आपल्या मोकळ्या केसांना हेअर ब्रॅन्ड लावला. त्यावेळी तिच्याकडे गुलाबी रंगाची टोट बॅग होती. मुंबईमध्ये सारा रिक्षातून पहिल्यांदाच फिरलेली नाही. यापूर्वीही ती अनन्या पांडेबरोबर रिक्षातून भटकलेली बघितली गेली आहे. मात्र त्यावेळी सोशल मिडीयापासून स्वतःची ओळख लपवण्यासाठी तेंव्हा दोघींनी ओढणीने चेहरे झाकून घेतले होते. गोविंदाचा धमाल कॉमेडी “कुली नं 1″चा रिमेक आणि “लव्ह आज कल 2′ या दोन्ही सिनेमांमध्ये सारा दिसणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.