बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणातील चौकशीत बॉलीवूडमधील ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणी सध्य एनसीबीने आघाडीच्या अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांची नुकतीच चौकशी केली.
ड्रग्ज प्रकरणी चौकशीच्या फे-यात अडकलेली सारा दिवंगत अभिनेता सुशांतसिंहसोबतच्या रिलेशनशिपमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. साराने एनसीबी चौकशीत सुशांतला डेट करत असल्याचे स्वीकार केले असून तिने ब्रेकपचेही कारण सांगितल्याचे समजते.
साराने सांगितले की, सुशांत हा रिलेशनशिपमध्ये लॉयल नव्हता. तो रिलेशनशिपबाबत खूपच पजेसिव्ह होत असे आणि त्याला चित्रपटात काम मिळविण्यासाठी मला तो चित्रपट निर्मात्यांना कन्विंस करण्यास सांगायचा.
दरम्यान, असेही सांगितले जात आहे की साराने सुशांतबरोबर थायलंड ट्रिपवर जाण्यास सहमती दर्शविली होती. यासह ती त्याच्याबरोबर पार्ट्यांमध्येही सहभागी होत होती. साराने मात्र सुशांतसोबत ड्रग्ज घेतल्याचे नाकारले आहे. सारा म्हणाली की, तिने फक्त सुशांतसोबत सिगारेट ओढली होती.