सैफ अली खान आणि अमृता सिंगची कन्या सारा अली खान सध्या नवोदित नायिकांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. “लव आज कल 2′ चित्रपटामुळे सारा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी फारशी पसंती दिलेली नसली आणि कथानक व मांडणीत फारसा दम नसला तरी साराच्या भूमिकेची अनेकांनी प्रशंसा केली आहे.
यानिमित्ताने अनेक जण या नवोदित अभिनेत्रीविषयी जाणून घेताना दिसत आहेत. साराच्या आयुष्याशी निगडित अनेक गोष्टी या रंजक आहेत. साराने आपले शिक्षण अमेरिकेमध्ये पूर्ण केले असून आजही ती अनेकदा तिकडच्या मित्र-मैत्रीणींना भेटण्यासाठी जात असते.
याबाबत स्वतः साराच सांगते की, मी अमेरिकेला जेव्हा जेव्हा जाते तेव्हा तपासणी करणारे अधिकारी मला आडवतात. याचे कारण साराने केलेला मेकओव्हर. अनेकांना हे ठाऊक नसेल पण सारा अली खानचे वजन तब्बल 96 किलो होते. तिच्या पासपोर्टवरही त्यावेळचाच फोटो आहे. त्यावेळी सारा खूप वेगळी दिसायची.
View this post on Instagram
त्यामुळेच तिला विमानतळापासून अन्य ठिकाणी जिथे ओळखपत्र दाखवावे लागते तिथे आपल्या या मेकओव्हरविषयी बोलावे लागते. अनेक अधिकारी तिच्यावर विश्वास ठेवत नाहीत.
आणखी एक गंमत म्हणजे काही वेळा तिला आडनावावरूनही रोखले जाते. कारण साराकडे एक स्टुडंट व्हिसाही आहे. यावर तिचे आडनाव सुलतान असे लिहिले आहे.