कार्तिक आर्यनला सारा बरोबर शुटिंग करायचे नाही

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हे आपल्या रिलेशनबाबतच्या बातम्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले असतात. या दोघांचे एकत्र फोटो आणि व्हिडीओही नेहमी व्हायरल होत असतात. पण सारा अली खानबरोबर एकत्र शुटिंग करण्यास मात्र कार्तिक आर्यन विशेष उत्सुक नाही. त्याचा खुलासा अलिकडेच झाला आहे.

कार्तिक आणि सारा हे दोघेही इम्तियाझ अलीच्या “लव्ह आज कल 2′ मध्ये एकत्र आहेत. या सिनेमाचे शुटिंगदेखील पूर्ण झाले आहे. मात्र अगदी थोडेसे काम शिल्लक राहिले आहे. पण तेवढेही कार्तिकला साराच्या बरोबर करायचे नाही आहे. जोपर्यंत सिनेमातला अगदी महत्वाचा सीन असत नाही, तोपर्यंत आपल्याला शुटिंगच करायचे नाही, असे त्याने इम्तियाझ अलीला सांगितलेही आहे.

त्याच्या या पवित्र्यावरच सगळेच थोडे चक्रावले आहेत. “लव्ह आज कल 2′ पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. तर भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडेबरोबरचा कार्तिकचा “पती, पत्नी और वो’ अलिकडेच रिलीज झाला आहे. त्याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी कार्तिकने “लव्ह आज कल 2’च्या शुटिंगमधून ब्रेक घेतला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.