Sara Ali Khan । बॉलिवूड अभिनेत्री ‘सारा अली खान’ ही सिनेइंडस्ट्रीतील उभरती स्टार मानली जाते. अनेकदा ती तिच्या किलर लूकने चाहत्यांची मनं जिंकते. सारा खूपच उत्स्फूर्त आहे आणि तिच्या सोशल मीडिया पोस्ट देखील याची साक्ष देतात.
सारा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेकदा फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असते. आणि तिचे चाहते देखील अभिनेत्रीच्या या फोटो आणि व्हिडिओला नेहमीच पसंती देत असतात. । Sara Ali Khan
अश्यातच, अभिनेत्रीने पुन्हा एकदा सोशलवर आपला जलवा दाखवला आहे. नुकतंच साराने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही नवीन फोटो शेअर केले असून, हे फोटो सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहेत.
या फोटोंमध्ये सारा अली खान पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड साडी आणि चेकर्ड ब्लाउजमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री समुद्र किनाऱ्यावर हे फोटोशूट करताना दिसत आहे. ग्लॉसी मेकअपसह पोनीटेलमध्ये केस बांधून सारा अली खानने अनेक पोझ दिल्या.
यावेळी सारा अली खानने कानातले, अंगठी आणि उंच टाचांसह तिचा लूक ऍक्सेसराइज केला. सारा कधी तिच्या पारंपरिक लूकमध्ये, कधी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये तर कधी तिच्या बोल्ड अवतारात सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. । Sara Ali Khan