कृषी विधयकावरून सपना चौधरी मीडियावर भडकली

नवी दिल्ली  – राज्यसभेत कृषी क्षेत्राशी संबंधीत विधेयक मंजूर झाले. या विधेयकांना विरोध केला जात आहे.  हरियाणाची डान्सर और एक्ट्रेस सपना चौधरी यांनी या विधेयकांवर टीका केली आहे.


सपनाने  इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडियो पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे,’सुशांत केसमध्ये जसे लोकांनी एकत्र येऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती त्याचप्रमाणे  सर्वांनी  एकत्र येत देशातील इतर महत्वाच्या मुद्यावर म्हणजे कृषी विधयकावर विरोध दर्शवायला हवा, देशातील शेतकऱ्याला पाठिंबा द्यायला हवा.’

ती पुढे म्हणाली,’काही दिवसांपूर्वी देशात कृषी  आंदोलन झाले होते, त्यावेळी अनेक शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. या आंदोलनावेळी अनेक शेतकऱ्यांना मारहाण सुद्धा झाली होती.  शेतकरी म्हणतात आमच्या मागण्या मान्य करा त्यांच्या मागण्या सरकार नाही पूर्ण करणार तर कोण करणार असा प्रश्नही तिने विचारला आहे.

दरम्यान या व्हिडियोमध्ये  मीडियातील पत्रकारांवर तिने संताप व्यक्त करत सल्ला दिला आहे की,’शेतकऱयांच्या आवाज तुम्ही सरकार पर्यंत पोहचवू शकता . तसेच ती पुढे म्हणाली की, मोदी सरकारला सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे कि त्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी.’ असंही तिने या व्हिडियो म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडियो चांगलाच व्हायरल होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.