मुंबई – बॉलीवूडची दंगल गर्ल अभिनेत्री सान्या मल्होत्रा लवकरच तिच्या आगामी शकुंतला देवी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटानंतर तिची आणखी एका चित्रपटात वर्णी लागली आहे. ‘पगलैट’ असं या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सान्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दरम्यान, गणेश पूजा करून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. सान्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हे फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटानंतर दिग्दर्शक अनुराग बासू यांच्याही एका चित्रपटात ती झळकणार आहे. यामध्ये अभिषेक बच्चन, राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, अशी तगडी स्टारकास्ट भूमिका साकारणार आहे. पुढच्या वर्षी १३ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.