Santosh Jagtap Murder: वाळू व्यावसायिक संतोष जगताप खून प्रकरणातील आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी

लोणी काळभोर – उरुळी कांचन (ता. हवेली) येथे संतोष जगताप याच्यावर सोनाई हॉटेलसमोर गोळीबार करून फरार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट 6 शाखेच्या पथकाने 30 तासांच्या आत जेरबंद करण्यात यश मिळवले. त्यांना न्यायालयाने आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन गोरख मिसाळ, (वय 29, रा. दत्तवाडी, उरळी कांचन) व महादेव बाळासाहेब आदलिंगे ( वय 26, रा. जूनी तांबेवस्ती, दत्तवाडी, उरळी कांचन) या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट 6 शाखेच्या पथकाने इंदापूर परिसरातून अटक केली होती. लोणी काळभोर पोलीसांनी दोघांना सोमवारी (दि. 25) न्यायालयात हजर केले होते. दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या युक्तीवादा नंतर न्यायालयाने वरील दोघांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.