Santosh Deshmukh Case | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यासह इतरांवर मोक्काही लावण्यात आला आहे. तर कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.
यातच आता संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर येथे आज सकाळी 11:30 वाजता जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी देशमुख कुटुंबिय मस्साजोग येथून छत्रपती संभाजी नगरकडे रवाना झाले आहेत. याशिवाय मनोज जरांगे, भाजप आमदार सुरेश धस हे मान्यवरही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा बंदोबस्त प्रशासनाकडून तैनात करण्यात आला आहे. मोर्चा सकाळी १० वाजता क्रांती चौकातून सुरू होऊन विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जाणार आहे. या मोर्चात सर्व जाती, धर्म आणि पक्षांच्या संघटना सहभागी होणार असून, पीडित देशमुख व सूर्यवंशी कुटुंबीयांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. मोर्चा क्रांती चौक, पैठण गेट, निराला बाजार मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जाणार असून, मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. Santosh Deshmukh Case |
तर दुसरीकडे बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाती घेतील आहेत. बीडची परिस्थिती पाहता पालकमंत्री पदी राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपुख्यमंत्री व्हावेत अशी आमची पूर्वीपासून मागणी होती. ती मागणी आता पूर्ण झाली आहे. अजित पवार यांना मोठा अनुभव असल्याने बीडचे काम आता अतिशय चांगले होईल अशी खात्री आहे, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली.
हेही वाचा :