#Wari2019 Photo : माऊलींची पालखी दिवे घाटात, आज सासवडमध्ये मुक्काम

पुणे – पुणे शहरातील भवानी पेठेतल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये घेतलेल्या दोन दिवसाच्या मुक्कामनंतर शुक्रवारी सकाळी सहा वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज पुण्यातून सासवडच्या दिशेने प्रस्थान केले. त्यानंतर आज सांयकाळी पाचच्या सुमारास माऊलींचा पालखी सोहळा दिवेघाटातून सासवडकडे मार्गस्थ झाला. यावेळी पुण्याच्या हडपरसमधून दिवे घाटात वारी दाखल होताच दिवे घाटात अलोट जनसागर लोटला होता.

टाळ- मृदगांच्या गजरात माऊलींची पालखी दिवे घाटात दाखल झाली.
दिवे घाटात वारी दाखल होताच दिवे घाटात अलोट जनसागर लोटला होता.
दिवे घाटात माऊलींच्या वेशात चिमुकली…
दिंड्या-पताका घेऊन वारकरी पढंरीची वाट चालताना..
भर पावसात नाचत- गात वारीचा आनंद घेत वारकरी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होताना
माऊलींच्या पालखीचे दिवे घाटातून प्रस्थान झाल्यानंतर स्वच्छता करताना युवक

Leave A Reply

Your email address will not be published.