“सनक’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर

जगभरात करोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले. अनेक महिने बंद असलेले चित्रपटगृह उघडण्यात आल्यानंतर काही चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. 

मात्र, या चित्रपटांना चाहत्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. अशा परिस्थितीत चित्रपट निर्मात्यांचा कल ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वाढला आहे. बॉलीवूड अभिनेता विद्युत जामवाल याचा आगामी “सनक ः होप अंडर सीज’ हा चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. 

विद्युत जामवालचा हा 14 महिन्यांतील चौथा चित्रपट आहे, जो थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कनिष्क वर्माने केले आहे. यात विद्युत जामवालसह बंगाली अभिनेत्री रुक्‍मिणी मैत्रा मुख्य भूमिका साकारत आहे.

 हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या घोषणेसह निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर लॉन्च केले आहे. यात विद्युत जामवाल हा बंदूक घेऊन मीशनसाठी सज्ज असल्याचे दिसत आहे. दरम्यान, या चित्रपटाची रिलीज डेट निश्‍चित करण्यात आलेली नाही. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून विद्युत जामवाल लवकर चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.