…म्हणून संजू बाबा अचानक पत्नीसह झाला परदेशाला रवाना

मुंबई – बॉलिवूडचा संजू बाबा अर्थात अभिनेता ‘संजय दत्त’ फुफ्फुसांच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. खुद्द संजय दत्तने काही दिवसांपूर्वी ट्विटरवरून आपल्या फॅन्सला ही चिंताजनक बातमी सांगितली. संजयचा कॅन्सर चौथ्या स्टेजवर पोहोचला आहे.

संजय दत्तला श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे 11 ऑगस्ट रोजी मुंबईतील रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान संजय दत्तला कर्करोग झाल्याचे निदान झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये किमोथेरपीचा पहिली टप्पा पूर्ण केला.

दरम्यान, आता पुढील वैद्यकीय उपचारासाठी संजय दत्त आपली पत्नी मान्यता सह परदेशात रवाना झाला आहे. संजूबाबाच्या प्रकृतीसाठी बॉलिवूडमधील कलाकार आणि त्याचे चाहते चिंतातूर झाले आहे. संजय दत्त आणि पत्नी मान्यता 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता मुंबईतून दुबईला रवाना झाले.

‘वैद्यकीय उपचारासाठी मी कामापासून काही काळ ब्रेक घेणार आहे. माझ्या चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी उगाच अफवा पसरवू नयेत. माझे कुटुंबीय माझ्या बरोबर आहेत. मी लवकरच परत येईन. अशा आशयाचे ट्विट संजू बाबाने गेल्या काही दिवसांपूर्वी केले होते.

 

View this post on Instagram

 

🙏🏻

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay) on

Leave A Reply

Your email address will not be published.