मुंबई – बॉलिवूडचा संजू बाबा अर्थात अभिनेता ‘संजय दत्त’ फुफ्फुसांच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. खुद्द संजय दत्तने काही दिवसांपूर्वी ट्विटरवरून आपल्या फॅन्सला ही चिंताजनक बातमी सांगितली. संजयचा कॅन्सर चौथ्या स्टेजवर पोहोचला आहे.
संजय दत्त म्हणाला की, ‘वैद्यकीय उपचारासाठी मी कामापासून काही काळ ब्रेक घेणार आहे. माझ्या चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी उगाच अफवा पसरवू नयेत. माझे कुटुंबीय माझ्या बरोबर आहेत. मी लवकरच परत येईन. अशा आशयाचे ट्विट संजू बाबाने केले होते.
संजूबाबाच्या या ट्विटमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला प्रत्येकजण त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करतोय. दरम्यान, संजय दत्तला पुढीच्या उपचारांसाठी अमेरिकेला जायचे होता पण आता या प्लॅनमध्ये बदल केला जाईल.
View this post on Instagram
I miss them so much❤️ To everyone who is with their families right now, cherish them!
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलेल्या माहिती नुसार, संजय दत्तने आपला अमेरिकेला जाण्याचा निर्णय बदलला असून, तो मुंबईमध्येच उपचार घेणार आहे. कोरोना महामारीमुळे अमेरिकेला जायचे की नाही या पेचामध्ये तो आहे. तर दुसरीकडे संजय दत्तच्या फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होते आहे आणि त्याचे प्रमाण सुद्धा वाढते आहे. आता पर्यंत त्याच्या फुफ्फुसांमधून 1.5 लीटर इतके पाणी काढले आहे.