फलटण – महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची 2016 साली निवड झाली होती.
आपल्या कार्यकाळात संजीवराजे यांनी खो खोच्या वाढीसाठी विशेष परिश्रम घेतले. संजीवराजे यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथे राष्ट्रीय किशोर-किशोरी खो खो स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. याबद्दल संजीवराजे यांचे विशेष कौतुक राष्ट्रीय पातळीवर झाले होते. त्याशिवाय अन्य क्रीडा स्पर्धांसाठी त्यांचा कायमच मदतीचा हात असतो. या कार्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नाने संजीवराजे यांचीे महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षपदी 2020-24 या कार्यकाळासाठी बिनविरोध फेरनिवड झाली आहे. पुणे येथे संघटनेच्या काल (दि. 15) झालेल्या बैठकीत ही निवड झाली.